अंतराळयात्री
अंतराळवीर हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अंतराळप्रवास करणारा मनुष्य आहे.राकेश शर्मा हे भारतातले पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान रशियाकडे जातो. रशियाने सर्वप्रथम 'स्पुटनिक' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग युरी गागारिन यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले.- पहिला सजीव अंतराळवीर : लायका नावाची कुत्री (रशिया)
- पहिला पुरुष अंतराळवीर : युरी गागारीन (रशिया)
- पहिली महिला अंतराळवीर : व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा (रशिया)
- चंद्रावर उतरणारा पहिला मानवः नील आर्मस्ट्राँग (अमेरिका)
नील आर्मस्ट्राँग (इंग्रजी: Neil Armstrong, जन्मः ५ ऑगस्ट १९३०) हा एक अमेरिकन अंतराळवीर,अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक आहे. नील आर्मस्ट्राँग हा जगातील चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव आहे.नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले.
Valentina Tereshkova, 1963 first woman in space.************************************************************************************************************************************************************************************************************************************************************************
आपले तारे
तार्यांची निर्मिती - तार्यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि वायू ( खासकरुन हायड्रोजन) यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना नेब्यूला अथवा तेजोमेघ म्हणून ओळखले जाते. या नेब्यूल्यांची घनता फार कमी साधारण १-१० अणू प्रतिघन सें.मी. इतकी असते. (आपण श्वास घेत असलेल्या हवेची घनता १०१९ अणू प्रतिघन सें.मी. इतकी आहे). यानंतर विश्वातले मूलभूत असणारा गुरुत्वीय बल आपले कार्य करते. मेघातील अणू परस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. अखेर एका ठराविक मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. गाभ्याकडे ढासळणार्या अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि आदितार्याचा जन्म होतो. ‘'आदितारा’' ही ताऱ्याची प्राथमिक अवस्था होय. आदितार्यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णताधारक वस्तूतून ज्याप्रकारे अवरक्त किरण निघतात , त्याचप्रकारे आदितार्यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून आदितारे पाहता येतात. काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठराविक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते.तार्याचा उदय/तार्यातील उर्जानिर्मिती - आदिताऱ्याच्या गाभ्याचे तापमान वाढत जाऊन १० दशलक्ष केल्विन इतके होते त्यावेळी अणुकेंद्र संमीलनाच्या (Nuclear Fusion) क्रियेद्वारे हायड्रोजनचे ज्वलन सुरू होते. या क्रियेत हायड्रोजनचे चार अणू एकत्र येऊन त्यांच्यापासून ‘हेलियम’चा एक अणू तयार होतो. मात्र हायड्रोजनच्या चार अणूंचे वस्तुमान व एका हेलियम अणूचेवस्तुमान यात किंचित (०.७० टक्के) फरक आहे. यामु़ळे आइन्स्टाइनच्या E=mc२ ( E = निर्माण होणारी उर्जा, m= वस्तुमानातील फरक, घटलेले वस्तुमान, c= प्रकाशाचा वेग जो ३,००,००० प्रती सेकंद इतका प्रचंड आहे) या सूत्रानुसार त्याचे उरलेल्या वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा प्रकाश व उष्णता यांच्या स्वरूपात अवकाशात फेकली जाते. यालाच ताऱ्याचा जन्म झाला असे म्हणतात. अशाच प्रकारे आपल्याला सुर्यापासुन उर्जा मिळते व पृथ्वीवर अन्नस्त्रोत निर्माण करायला कारणीभूत ठरते. जसा प्रकाश बाहेर पडू लागतो, तसा आदितारा दृश्यमान होऊ लागतो. यालाच ताऱ्याचा जन्म झाला असे म्हणतात. वास्तविक तार्याची निर्मिती प्रक्रिया पूर्वीच तेजोमेघात सुरू झालेली असते. मात्र अणुकेंद्र संमीलनातून प्रकाशाच्या उत्सर्जनाने तारा प्रथमच दिसू लागतो. अणुकेंद्र संमीलनाची ही प्रक्रिया शृंखलाबद्ध असते. यातुन सतत हायड्रोजनचे ज्वलन होऊन त्यातून ऊर्जा आणि शृंखलेतील पुढचे हेलियम तयार होत रहाते.
तार्यांची निर्मिती - तार्यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि वायू ( खासकरुन हायड्रोजन) यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना नेब्यूला अथवा तेजोमेघ म्हणून ओळखले जाते. या नेब्यूल्यांची घनता फार कमी साधारण १-१० अणू प्रतिघन सें.मी. इतकी असते. (आपण श्वास घेत असलेल्या हवेची घनता १०१९ अणू प्रतिघन सें.मी. इतकी आहे). यानंतर विश्वातले मूलभूत असणारा गुरुत्वीय बल आपले कार्य करते. मेघातील अणू परस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. अखेर एका ठराविक मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. गाभ्याकडे ढासळणार्या अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि आदितार्याचा जन्म होतो. ‘'आदितारा’' ही ताऱ्याची प्राथमिक अवस्था होय. आदितार्यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णताधारक वस्तूतून ज्याप्रकारे अवरक्त किरण निघतात , त्याचप्रकारे आदितार्यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून आदितारे पाहता येतात. काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठराविक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते.
तार्याचा उदय/तार्यातील उर्जानिर्मिती - आदिताऱ्याच्या गाभ्याचे तापमान वाढत जाऊन १० दशलक्ष केल्विन इतके होते त्यावेळी अणुकेंद्र संमीलनाच्या (Nuclear Fusion) क्रियेद्वारे हायड्रोजनचे ज्वलन सुरू होते. या क्रियेत हायड्रोजनचे चार अणू एकत्र येऊन त्यांच्यापासून ‘हेलियम’चा एक अणू तयार होतो. मात्र हायड्रोजनच्या चार अणूंचे वस्तुमान व एका हेलियम अणूचेवस्तुमान यात किंचित (०.७० टक्के) फरक आहे. यामु़ळे आइन्स्टाइनच्या E=mc२ ( E = निर्माण होणारी उर्जा, m= वस्तुमानातील फरक, घटलेले वस्तुमान, c= प्रकाशाचा वेग जो ३,००,००० प्रती सेकंद इतका प्रचंड आहे) या सूत्रानुसार त्याचे उरलेल्या वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा प्रकाश व उष्णता यांच्या स्वरूपात अवकाशात फेकली जाते. यालाच ताऱ्याचा जन्म झाला असे म्हणतात. अशाच प्रकारे आपल्याला सुर्यापासुन उर्जा मिळते व पृथ्वीवर अन्नस्त्रोत निर्माण करायला कारणीभूत ठरते. जसा प्रकाश बाहेर पडू लागतो, तसा आदितारा दृश्यमान होऊ लागतो. यालाच ताऱ्याचा जन्म झाला असे म्हणतात. वास्तविक तार्याची निर्मिती प्रक्रिया पूर्वीच तेजोमेघात सुरू झालेली असते. मात्र अणुकेंद्र संमीलनातून प्रकाशाच्या उत्सर्जनाने तारा प्रथमच दिसू लागतो. अणुकेंद्र संमीलनाची ही प्रक्रिया शृंखलाबद्ध असते. यातुन सतत हायड्रोजनचे ज्वलन होऊन त्यातून ऊर्जा आणि शृंखलेतील पुढचे हेलियम तयार होत रहाते.
स्थिर अवस्था
तार्यात अणुंची गाभ्याकडे ढासळण्याची क्रिया ही अखेर थांबते. याला कारणीभुत ठरते ती अणुकेंद्र संमीलनातून निर्माण होणाऱ्या उष्मीय दाबा व उर्जा. गुरुत्वाकर्षण ताऱ्याला आतल्या बाजूने खेचत असते, तर दाब बाहेरच्या बाजूने ढकलत असतो. ही दोन्ही बले परस्परांना संतुलित करतात , यामुळे गाभ्याचे तापमान प्रचंड ही राहते अणुकेंद्र संमीलनाची प्रक्रिया चालु ठेवण्यास मदत करते व तारा स्थिरावतो. या स्थितीला हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रीयम असे म्हणतात. तारा हायड्रोजनचे ज्वलन चालु असे पर्यंत बहुतांश काळ याच स्थितीत व्यतीत करतो. हा त्याचा ‘मेन सिक्वेन्स’ काळ होय. आपला सुर्य साधारण ५ अब्ज वर्षापसुन याच स्थितीत आहे व अजून ५ अब्ज वर्ष तो याच स्थितीत असेल, मात्र अखेर त्याचे इंधन म्हणजेच हायड्रोजन संपुन इतर तारयांप्रमाणे सुरू होईल त्याचा अंतकाळ.
तार्यांचा अंत - अणुकेंद्र संम्मीलनात हायड्रोजनचे रुपांतर होत असल्याने तो कमी होत जातो तर हेलियम वाढत जातो. यात ताऱ्याला बाहेरच्या बाजूने ढकलणारा उष्मीय दाब गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत कमी होत आणि गाभा आकुंचन पावू लागतो. या आकुंचनामुळे गाभ्याची घनता वाढते. परिणामी तापमान आणि ज्वलन प्रक्रियेचा वेगही वाढू लागतो. याचा परिणाम तारा अधिकाधिक तेजस्वी दिसू लागण्यात होतो. यालाच तारा सुजणे किंवा फुगणे असे म्हणतात. जेव्हा ताऱ्याच्या अंतर्भागातील हायड्रोजन पूर्णपणे संपुष्टात येतो व ऊर्जानिर्मिती थांबते तेव्हा गुरुत्वीय बल इतके प्रभावी बनते की, गाभ्यात फक्त हेलियम उरलेला असतो त्याचेही ज्वलन सुरु होते. ही क्रिया साधारण गाभ्याचे तापमान जेव्हा सुमारे १० कोटी केल्विन पर्यंत पोहोचते तेव्हा होते आणि ताऱ्याला ऊर्जा निर्मितीचा दुसरा स्रोत मिळतो. या क्रियेस ट्रिपल अल्फा प्रोसेस असे म्हणतात. यात कार्बन तयार होतो व गाभ्याचे आकुंचन चालूच राहते. काही वर्षांनी तापमान इतके उच्च होते की, हेलियमच्या गाभ्याचा प्रचंड स्फोट होतो. यालाच सुपर नोव्हा असे म्हणतात. हा स्फोट अतिशय प्रचंड असून तरी तीव्र उर्जेचे गॅमा किरण त्यातुन बाहेर पडतात. पृथ्वीपासून काही प्रकाशवर्षे अंतरावर जरी असा स्फोट झाला तरी पृथ्वी वरील जीवन पुर्णपणे नष्ट होईल. या स्फोटात तार्याचे वस्तुमान जरी विखुरले जात असले तरी असा प्रचंड स्फोटही ताऱ्याला पूर्णपणे संपवू शकत नाही. अखेर ' चंद्रशेखर मर्यादा ' नुसार हे ठरते की तारा श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा व कृष्णविवर यापैकी काय बनेल
ग्रहानुवर्ती अभ्रिका -विश्व जन्मास आले त्यावेळी अवकाशात हेलियम व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये विपुल प्रमाणात तयार झाली असे मानले जाते. इतर जड मूलद्रव्ये (उदा. प्राणवायू,नत्र, इ.) तार्यांमुळे निर्माण झाली. तारे हे अशी मूलद्रव्ये बनविण्याची भट्टी आहे. ताऱ्यांना त्यांची ऊर्जा हायड्रोजन अणूंच्या केंद्रकांच्या संयोगातून हेलियम निर्माण करून मिळते असे मानले जाते. असा तारा कोट्यावधी वर्षे अशा रीतीने ऊर्जा मिळवतो. या प्रक्रियेअंती ताऱ्याच्या गाभ्यातील हायड्रोजन संपून जातो. अशा वेळी तारा आकुंचन पावतो आणि यामुळे वाढलेल्या तापमानात हेलियमचे रूपांतर कार्बनमध्ये होण्यास सुरुवात होते. पुढे अशाच प्रक्रियांमधून इतर मूलद्रव्येही निर्माण होतात असे मानले जाते. ही मूलद्रव्ये बाहेर अवकाशात विखुरली जातात. ताऱ्याच्या वार्धक्याच्या काळात एक वेळ अशी येते की, ताऱ्याचे बाहेरील कवच ताऱ्यातील अस्थिर स्थितीमुळे दोलायमान होते. याचे पर्यवसान अंतिमत: ताऱ्याचे बाहेरचे कवच अवकाशात उधळण्यात होते. या प्रक्रियेतच ताऱ्यात निर्माण झालेली मूलद्रव्ये अवकाशातच विलीन होतात. तारा व त्यातून भिरकावलेल्या वायू व मूलद्रव्यांचा ताऱ्याभोवती एक प्रकाशमान ढग तयार होतो. ज्यास ग्रहानुवर्ती अर्भिका (planetary nebulae) म्हणतात. या घटनेनंतर तारा मृत्युपंथाला लागतो. पण ताऱ्यातून अवकाशात विखुरलेली ही मूलद्रव्ये पृथ्वीसारखे ग्रह व त्यावरील मानवासारखे जीव बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जुलै २०१० मध्ये स्पिट्झर या या अवकाशस्थित दुर्बिणीला बकीबॉल या बकीबॉल हा आजवर अवकाशात सापडलेला सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आणि विशाल रेणूंचा साठा टीसी-१ या ग्रहानुवर्ती अभ्रिकेत आढळला होता.
~ wikipedia,The Free encyclopedia ~
http://en.wikipedia.org **********************************************************************************
***********************************************************************************
कृष्ण विवर
इतर कुठल्याही अवकाशीय गोष्टीने इतके गांभीर्य आणि रहस्य निर्माण केले नाही जितके कृष्णविवराने केले. कारण भौतिक शास्त्राचे मूळ नियम कृष्णविवरामध्ये लागू होत नाहीत. अशी गोष्ट समजून घेण्यासाठी आपणास वेगळ्या दृष्टीने विचार करून थोडी कल्पनाशक्ती लावावी लागते. अती प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या तार्यांच्या स्फोटानंतर त्याच्या केंद्रस्थानी कृष्णविवराची निर्मिती होते. त्यामुळे प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या या कृष्णविवरामधून कोणतीही गोष्ट बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाशसुद्धा त्याच्या गुरुत्वाकर्षणाने परत खेचला जातो. या जागेतील मुक्तीवेग प्रकाशापेक्षाही जास्त असतो. एखाद्या गोष्टीचे वस्तुमान जेवढे जास्त तितकाच तिच्यापासून बाहेर पडण्याचा वेग जास्त असतो. यालाच मुक्तिवेग असे म्हणतात. कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षण प्रचंड असल्याने त्यापासून मुक्तिवेग हा प्रकाशापेक्षा जास्त असतो. ज्याअर्थी कुठलीही गोष्ट प्रकाशापेक्षा वेगवान नसल्याने कृष्णविवरातून कोणतीही गोष्ट बाहेर पडू शकत नाही.
आईन्स्टाईनने सांगितलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धान्तामध्ये सर्वप्रथम कृष्णविवराच्या अस्तित्वासंबंधी कल्पना निर्माण झाली. गुरुत्वाकर्षणाचा काळावर कसा परिणाम होतो ते या सिद्धान्तामुळे स्पष्ट झाले. एखादी गोष्ट जितकी गुरुत्वाशाली तितकीच ती काळाचा वेग कमी करते. कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते की इथे काळ जवळजवळ थांबलेला असतो. जर तुम्ही कृष्णविवराच्या बाहेर उभे राहून त्यामध्ये जाणार्या एखाद्या विमानाला पाहत असाल तर ते विमान संथ गतीने लहान होत अदृश्य होताना दिसेल. कृष्णविवरासंबंधी अशी सर्वसाधारण 'खोटी' समजूत आहे की ते आपल्या आसपासच्या सर्व गोष्टी स्वतःमध्ये खेचून घेते, परंतु हे सत्य नाही. एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच्याच गोष्टीच फक्त तो स्वतःमध्ये खेचून घेतो, त्या पालीकडील तार्यांना तो इतर प्रचंड तार्यांप्रमाणे काहीही परिणाम करत नाही. जसे समजा आपल्या सूर्याचे जर कृष्णविवरामध्ये रुपांतर झाले तरी सर्व ग्रह जसे आता सूर्याभोवती गोलाकार फिरत आहेत तसेच तेव्हा देखिल फिरत राहतील.
कृष्णविवराची रचना
आकाराने प्रचंड मोठ्या तार्याचे जेव्हा कृष्णविवरामध्ये रुपांतर होते तेव्हा तो स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने इतका लहान होत जातो की शेवटी तो जवळ जवळ अदृश्यच होतो. यावेळी तो अमर्याद लहान व अमर्याद जड बनतो. या एका अदृष्यरुप बिंदूला 'सिंग्युलॅरीटी' ( Singularity) असे म्हणतात. एक अशी अवस्था जी कृष्णविवराच्या केंद्रस्थानी असते आणि जिथे भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. या बिंदूरुप अवस्थेभोवती अदृश्य कुंपण निर्माण होते ज्यास 'घटना क्षितिज' म्हणजेच 'इव्हेंट होरयझन' ( Event Horizon) असे म्हणतात. 'घटना क्षितिज' हे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाची सीमाच असते. एक अशी सीमा जिच्या पालीकडून परतणे शक्य नाही. 'घटना क्षितिज' ही अशी एक जागा आहे जिथून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगाइतकाच असतो तर त्याच्या आतील कृष्णविवरापासून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. ज्याअर्थी प्रकाशापेक्षा कोणतीही गोष्ट जलद नसली तरी प्रत्यक्षात 'घटना क्षितिज' च्या पलीकडे मुक्तीवेग हा त्याच्यापेक्षा जास्त असल्याने प्रकाश देखिल इथून बाहेर पडू शकत नाही. बिंदूरुप अवस्थेपासून 'घटना क्षितिज' च्या पर्यंतच्या ( सिंग्युलॅरीटी ते इव्हेंट होरयझन ) अंतरालाच श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या असे म्हटले जाते. समजा आपल्या सूर्याचे जर कृष्णविवरामध्ये रुपांतर झाले तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३ कि. मी. असेल. सर्वसाधारण कृष्णविवराचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या १० पट इतके असते. तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३० कि. मी. इतकी असते.
ज्याअर्थी प्रकाशदेखील या कृष्णविवरापासून बाहेर पडू शकत नाही त्याअर्थी आपण कृष्णविवर पाहू शकत नाही. मग अशी गोष्ट शोधण्याचा एक मार्ग आहे की अवकाशातील अशा गडद काळ्या जागेचा शोध घ्यायचा जेथील वस्तुमान प्रचंड असेल. अशी गोष्ट शोधताना खगोलशास्त्रज्ञांना नेहमीच आकाशगंगांचे केंद्र किंवा द्वैती तारे सापडतात. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांचे आता असे मत झाले आहे की, कृष्णविवरे प्रामुख्याने आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असतात. तर मग याचा अर्थ असा होतो की आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी देखिल कृष्णविवर असून ते आकाशगंगेतील सर्व वस्तुमान गिळंकृत करीत असेल; तर असे नसून त्या कृष्णविवराचे देखिल तेच वस्तुमान असेल ज्या तार्यापासून ते बनले असावे. जो पर्यंत 'घटना क्षितिज' ( Event Horizon) च्या जास्त जवळ एखादी गोष्ट जात नाही तोपर्यंत ती गोष्ट सुरक्षित असते.
आपल्या आकाशगंगेतील अब्जावधी तारे अब्जावधी वर्षापासून आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराभोवती प्रदक्षिणा करीत आहेत. क्ष-किरणांच्या शोधावरून या व इतर आकाशगंगांमधील कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध होते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते कृष्णविवरे प्रचंड प्रमाणात क्ष-किरणे ऊत्सर्जित करतात. आपल्या आकाशगंगेतील अनेक तारे हे द्वैती आहेत. काहीवेळेस अशा द्वैती तार्यांमधील एखाद्या तार्याचे जर कृष्णविवरात रुपांतर झाले तर कृष्णविवर प्रथम त्या दुसर्या तार्याचे वस्तुमान स्वतःकडे खेचू लागते. हे दुसर्या तार्याचे वस्तुमान त्या कृष्णविवराभोवती गोलाकार कक्षेमध्ये फिरू लागते. त्यामुळे कृष्णविवराभोवती त्या वस्तुमानाची चकती निर्माण होते जिला Acceleration Diskअसे म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते हे वस्तुमान कृष्णविवरामध्ये जाताना मोठ्या प्रमाणात क्ष-किरणे ऊत्सर्जित करते जर अशी एखादी घटना आढळलीच तर शास्त्रज्ञ पुढे त्या वस्तुमान नष्ट होत असलेल्या तार्याचा अभ्यास करतात. अशा प्रकारे त्या तार्याचा कृष्णविवराभोवती फिरण्याचा वेग आणि इतर गोष्टीवरून त्या कृष्णविवराच्या वस्तुमानाची कल्पना येते. जर त्या जोड तार्याचे वस्तुमान प्रचंड असेल तर मग नक्कीच तेथे कृष्णविवर असावे असे म्हणता येते. सध्या प्रसिद्ध असलेले कृष्णविवर हे हंस तारकासमुहातील एका जागेतून उत्सर्जित होणार्या प्रचंड क्ष-किरणांच्या स्रोतामुळे शोधले गेले.
~ wikipedia,The Free encyclopedia ~
http://en.wikipedia.org
********************************************************************************
********************************************************************************
ध्रुवतार्याचे स्थान अढळ नाही
पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये उत्तर दिशेस पाहिल्यास क्षितिजापासून थोडासा वर (मुंबईतून साधारण १९ अंश) आपणास ध्रुवतारा दिसतो. बर्याच लोकांना ध्रुवतारा तेजस्वी असावा असे वाटते, पण प्रत्यक्षात तो दिसायला एक साधारण तारा आहे. संपूर्ण रात्रभर इतर तार्यांप्रमाणेच ध्रुवतार्याचे निरीक्षण केल्यास आपणास असे आढळेल की इतर सर्व तारे पुढे सरकतील पण ध्रुवतारा मात्र त्याच ठिकाणी असेल. (याचा अर्थ तो स्थिर आणि अढळ आहे असा होत नाही.)
प्रत्यक्षात ध्रुवतारा स्थिर नाही. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. एका मोकळ्या जागी उभे राहा. आता समोर कुठल्याही एखाद्या गोष्टीकडे तोंड करून उभे राहा. आता आपल्याभोवती एक फेरी मारून पुन्हा त्याच गोष्टीच्या समोर या. आपणास कळेल की सुरुवातीला आपल्यासमोर असलेली ती गोष्ट आपली फेरी पूर्ण झाल्यानंतर आपणास दिसली म्हणजेच जेव्हा आपण फेरी मारताना ती गोष्ट जेव्हा आपल्या पाठीमागे गेली तेव्हा ती दिसत नव्हती तर जेव्हा आपली फेरी पूर्ण झाली तेव्हा ती गोष्ट आपणास पुन्हा दिसली. अशाप्रकारे आकाशातील तारे पृथ्वीच्या गोल फिरण्याने कधी एका बाजूला तर कधी पृथ्वीच्या दुसर्या बाजूला जातात. त्यामुळे ते कधी दिसतात तर कधी दिसत नाहीत.
आता वर सांगितलेलेच उदाहरण परत वेगळ्या पद्धतीने पाहूया. इथे आता आपण घरामध्ये डोक्यावर असलेल्या दिव्याखाली उभे राहूया. आता उभ्याच स्थितीमध्ये वर डोक्यावरील दिव्याकडे पाहत त्याच प्रकारे आपल्याभोवती एक फेरी मारा. आपणास कळेल की फेरी मारताना देखिल डोक्यावरील दिवा आपण वर पाहत असल्याने एकाच ठिकाणी होता. म्हणजेच डोक्यावरील तो दिवा आपल्या शरीराच्या अक्षाच्या दिशेने असल्याने तो एकाच ठिकाणी दिसतो.
अशाप्रकारे पृथ्वी स्वतःभोवती म्हणजेच तीच्या अक्षाभोवती फिरते तेव्हा तीच्या अक्षाच्या दिशेने असलेला तारा आपणास स्थिर जाणवतो. सध्या उत्तर ध्रुवाच्या अक्षाच्या दिशेने ध्रुवतारा असल्याने तो स्थिर जाणवतो.
पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्याच सोबत ती सूर्याभोवती फिरते या व्यतिरिक्त पृथ्वीची अजून एक गती आहे म्हणजे 'परांचन गती' (इंग्रजीमध्ये तिला Precession Motion) असे म्हणतात. पृथ्वी सरळ उभी नसून ती तीच्या अक्षाभोवती २३.५ अंशाने कललेली आहे.
पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो २३.५ अंशांनी कललेला आहे.
![]() | ![]() |
या तिसर्या गतीमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते तो पृथ्वीचा कललेला अक्ष देखिल फिरतो. या पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २६,००० वर्षे लागतात. या २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा अक्ष आकाशामध्ये एक फेरी पूर्ण करताना तो अक्ष निरनिराळ्या दिशेने रोखला जातो आणि ज्यावेळेस या पृथ्वीच्या अक्षाच्या फेरीमध्ये एखादा तारा येतो तेव्हा तो तारा काळातील पृथ्वीचा 'ध्रुवतारा' म्हणून ओळखला जातो.
खालील चित्रामध्ये अंतराळातील तार्यांच्यामध्ये पृथ्वीचा कललेला अक्ष दाखविले दाखविला असून तो फेरी पूर्ण करताना कशाप्रकारे इतर तारे त्याच्या जागेमध्ये आल्याने तो तारा पृथ्वीचा ध्रुवतारा बनतो.

खालील चित्रामध्ये परांचन गतीच्या म्हणजेच पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला २६,००० वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे रिंगण दाखविले असून सध्याच्या इ. स. २००० या काळामध्ये रिंगणातील वरील जागेमध्ये सध्याचा ध्रुवतारा आहे. तर याआधी कालेय तारकासमुहातील 'ठुबान' हा तारा पृथ्वीचा ध्रुवतारा होता. तर यानंतर जवळपास १२,००० वर्षांनी या रिंगणाजवळ स्वरमंडळ तारकासमुहातील 'अभिजित' हा तारा पृथ्वीचा ध्रुवतारा असेल. म्हणजेच ध्रुवतार्याचे स्थान अढळ नाही. परांचन गतीचा फेरीमध्ये पृथ्वीचा ध्रुवतारा नेहमीच बदलला आहे. सध्याचा ध्रुवतारा हा देखिल काही काळाने बदलून भविष्यामध्ये दुसराच तारा ध्रुवतारा असेल.
सध्याचा ध्रुवतारा देखिल पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नसून तो किंचितसा बाजूला असल्याने तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो.
खालील चित्रामध्ये आपणास दिसेल की रात्रभर केलेल्या तार्यांच्या छायाचित्रणातून इतर तार्यांचे एक रिंगण झाले आहे तर त्या रिंगणाच्या मध्यभागी एक छोटासे रिंगण आहे. प्रत्यक्षात ध्रुवतार्याचे रिंगण आहे. ध्रुवतारा पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नाही त्यामुळे तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो.

पृथ्वीचा ध्रुवतारा हा फक्त पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातच नसून तो दक्षिण गोलार्धात देखिल असू शकतो. कारण पृथ्वीचा अक्ष हा दोन्ही बाजूस आहे. परंतु पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे होणार्या आकाशातील रिंगणामध्ये सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने इथे सध्या ध्रुवतारा नाही. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे आकाशात रिंगण होते . जेथे सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने सध्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ध्रुवतारा नाही.

~अवकाश वेध.कॉम~
~सचिन पिळणकर~
~सचिन पिळणकर~
http://www.avakashvedh.com

