7 September 2011

खगोल प्रेमींसाठी काहीश्या बातम्या ( मराठी)








*********************************************************************************************************************
प्लुटो ग्रहाची हकालपट्टी
आता प्लुटो या ग्रहाची हकालपट्टी करण्यात आली. प्लुटो ग्रह नाही याबाबत खगोलशास्त्रज्ञांचं एकमत झालं आहे. २४ ऑगस्ट २००६ मध्ये प्राग इथे इण्टरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनची सर्वसाधारण सभा भरली होती. खगोलशास्त्रज्ञाची जागतिक स्तरावरील सर्वात मोठी संस्था आहे. २६ व्या सभेत ७५ देशातील २५०० खगोलशास्त्रज्ञ सहभागी झाले होते. प्लुटोच्या दर्जाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्लुटोला ग्रह मानायचं नाही, असा निर्णय यात घेण्यात आला. खगोलशास्त्रांनी प्लुटोला 'खुजा ग्रह' असं म्हटलं आहे.

पूवीर् सूर्यमालेतील शेवटचा ग्रह शनी मानला जात असे. पण विल्यम हशेर्लने १७२१ मध्ये युरेनसचा शोध लावला. १८४६ मध्ये नेपच्यूनचा शोध लागला. युरेनसच्या अनियमित हालचाली निव्वळ नेपच्यूनमुळे होत नसाव्यात, असा खगोलशास्त्रज्ञांचा होरा होता. तो खरा ठरला आणि नव्या ग्रहाला प्लुटो म्हटलं गेलं.

प्लुटोचा व्यास चंदाच्या व्यासापेक्षा ६५ टक्क्यांनी कमी आहे. अन्य ग्रहांचं ऑरबीट गोलाकार आहे, पण प्लुटोचं ऑरबीट लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळं प्लुटो नेपच्यूनपेक्षाही सूर्याच्या अधिक जवळ जातो. हा ग्रह सूर्यापासून १४,६९,०३,५०० किमी अंतरावर आहे. मिथेन, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन हे घटक बर्फाच्या अवस्थेत आहेत.

सूर्यमालेतील नववा ग्रह पदच्युत होण्याचं कारण त्याच्या ऑरबीटमध्ये आहे. प्लुटो लंबवर्तुळाकार फिरत असल्याने तो सूर्यापासून लांब जातो. आता तो २३० वर्षं लांबच राहणार आहे. पृथ्वी विशिष्ट पद्धतीने ऑरबीटमध्ये फिरते पण प्लुटो १७ डीग्रीने कलून फिरतो. त्यामुळे तो लंबगोलाकर फिरत राहतो. प्लुटोला तीन चंद आहेत. अन्य ग्रह आणि त्यांचे चंद यांची कॉमन सेण्टर ऑफ ग्रॅव्हिटी ग्रहाच्या पृष्ठभागाखाली आहे. पण प्लुटो आणि त्याच्या चंदांबाबत ती एकमेकांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे प्लुटोला ग्रह मानू नये, या मतापर्यंत शास्त्रज्ञ आलेत.

प्लुटो हा क्युपर बेल्ट ऑब्जेक्ट ठरला आहे. प्लुटोच्या आसपास हजारो बर्फसदृश्य घटक आहेत. प्लुटोचं स्वरूपही तसंच आहे. त्यामुळे आपल्या सूर्यमालेतून एक ग्रह कमी झाला आहे.

- काइनस्टाइन








********************************************************************************************************************